भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे र

India- Pakistan Agree On Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'अमेरिकेच्या मध्यस्थीखाली दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत. सामान्य ज्ञान आणि कुशल बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल दोन्ही देशांचे आभार.'

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर - 

याशिवाय, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानच्या डीजीएमओने 12 वाजता फोन केला. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, संरक्षण मंत्रालय याबाबत संध्याकाळी 6.15 वाजता पत्रकार परिषदेद्वारे संपूर्ण माहिती देणार आहे. 

हेही वाचा - भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानली जाईल! मोदी सरकारचा मोठा निर्णय

हेही वाचा - भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य

दहशतवादी हल्ले युद्ध कृत्य मानले जातील - 

दरम्यान, भारत सरकारने आज भविष्यात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरुद्ध युद्धाचा गुन्हा मानला जाईल. तसेच दहशत पसरवणाऱ्या शत्रू देशाला भारत सरकार युद्धासारखे उत्तर देईल, अशी घोषणा केली आहे.