Sushila Karki Nepal PM : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान, घेतली शपथ
नेपाळची सूत्रे आता सुशीला कार्की यांच्या हाती आहेत. त्यांनी राष्ट्रपती भवनात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सध्या त्या नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. देशात सोशल मीडियावर बंदी आल्यानंतर, तरुणांनी रस्त्यावर येऊन प्रचंड गोंधळ घातला. संसदेपासून रस्त्यांपर्यंत गोंधळ, तोडफोड आणि जाळपोळ झाली. यानंतर पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद विसर्जित करण्याबाबत नेपाळच्या राजकीय पक्षांमध्ये एकमत झाले आहे. संसद विसर्जित करण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा निवडणुका देखील घेतल्या जातील.
हेही वाचा - SEBI New Rules: सेबीने IPO नियमांमध्ये केला मोठा बदल; म्युच्युअल फंडबाबतही करण्यात आल्या महत्त्वाच्या घोषणा
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीविरोधात जनरेशन झेडच्या निदर्शनांमध्ये एका भारतीय नागरिकासह किमान ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तरुणांनी सांगितले की, सरकार सोशल मीडियावर बंदी घालून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा - Firing at Disha Patni's Bareilly House: बरेलीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार
तथापि, तरुणांच्या निषेधानंतर, नेपाळच्या ओली सरकारला मागे हटावे लागले आणि बंदी उठवावी लागली. निषेध पाहता, ओली यांनाही राजीनामा द्यावा लागला. नेपाळमध्ये अलिकडेच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधी निदर्शनांमध्ये, देशभरातील सुमारे दोन डझन हॉटेल्सची तोडफोड, लुटमार किंवा आग लावण्यात आली. हॉटेल असोसिएशन नेपाळ (HAN) ने म्हटले आहे की, हिंसाचाराचा सर्वाधिक फटका काठमांडूमधील हिल्टन हॉटेलला बसला आहे, जिथे ८ अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.