भारतीय वापरकर्त्यांना हे अपडेट संध्याकाळपर्यंत मिळ

iOS 26 Release Date: iOS 26 आज होणार रिलीज; कसे करायचे डाउनलोड? जाणून घ्या

iOS 26 Release Date: अॅपलने iOS 26 चे अपडेट आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी रिलीज करण्याची घोषणा केली आहे. भारतीय वापरकर्त्यांना हे अपडेट संध्याकाळपर्यंत मिळण्यास सुरुवात होईल. हे अपडेट बराच काळ बीटा टेस्टिंगमध्ये होते आणि आता अधिकृतपणे रोल आउट होत आहे. मात्र, हे अपडेट सर्व आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसेल.

जर तुम्हाला iOS 26 लगेच डाउनलोड करायचा नसेल, तर Settings > General > Software Update मध्ये जाऊन Automatic Updates बंद करा. तसेच, Security Response आणि System Files पर्याय चालू ठेवा, ज्यामुळे महत्त्वाचे सिक्युरिटी अपडेट्स चुकणार नाहीत. हे अपडेट iPhone Xs, Xs Max आणि XR साठी उपलब्ध नसेल.

हेही वाचा - UPI Safety Tips: UPI वापरताना 'या' 5 चुका टाळा, नाहीतर बँक अकाउंट होऊ शकते रिक्त

अपडेट करण्यापूर्वी 'हे' लक्षात ठेवा

फोनमध्ये पुरेशी स्टोरेज जागा असावी चांगले इंटरनेट कनेक्शन असावे फोन पूर्णपणे किंवा किमान 50 टक्के चार्ज असावा

iOS 26 सपोर्ट करणारे आयफोन

iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max iPhone SE (2nd Gen) iPhone 12 Series iPhone 13 Series iPhone 14 Series iPhone 15 Series iPhone 16 Series (16, 16 Plus, 16 Pro, 16 Pro Max, 16e)

अपडेट कसे डाउनलोड करावे?

Settings उघडा General वर क्लिक करा Software Update पर्याय निवडा स्क्रीनवर दिसणारा iOS 26 अपडेट Download and Install करा. 

हेही वाचा - Online Shopping : ॲमेझॉन-फ्लिपकार्टवर ऑनलाइन शॉपिंग करताना थोडं सांभळूनच , अन्यथा...

तज्ञांच्या मते, अपडेट उपलब्ध होताच लगेच इन्स्टॉल करू नका. अनेक वेळा सुरुवातीच्या आवृत्तीत बग्स असतात. म्हणून काही दिवस थांबून, फीडबॅकनंतर अपडेट करणे जास्त सुरक्षित ठरेल.