Shri Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्णाच्या या 5 मंत्रांचा जप करा; जाणून घ्या त्यांचा अर्थ आणि परिणाम
Shri Krishna Janmashtami Mantras : श्रावणातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. यावेळी अष्टमी तिथी 16 ऑगस्ट रोजी येत आहे. याच्या दुसरा दिवस दहीहंडीचा असतो. जन्माष्टमी 15 आणि 16 तारखेला विभागून येत आहे आणि 16 तारखेला दहीहंडी-गोपाळकाला साजरा केला जाणार आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी जे लोक पूर्ण विधीपूर्वक भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात, त्यांना वर्षभर भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता यांचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप केल्याने पुण्यफळ देखील मिळते. ज्योतिषशास्त्रात मंत्रांचा जप करण्याचे विशेष परिणामदेखील सांगितले आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि आनंद आणि समृद्धी वाढेल, असे म्हटले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या 5 मंत्रांचा जप करावा, ते जाणून घेऊया.
हेही वाचा - Shri Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीला जन्मलेल्या मुलांसाठी श्रीकृष्णाची ही सुंदर नावे अर्थासहित
भगवान श्रीकृष्णाचे 5 मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय । मंत्राचा अर्थ आणि परिणाम : शास्त्रांनुसार, ॐ हा भगवान श्रीकृष्णाचा बीजमंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळतो. यासोबतच, व्यक्तीला मानसिक शांती तसेच, आत्मविश्वास मिळतो.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने प्रणत:। क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ॥ मंत्राचा अर्थ आणि परिणाम : पुराणांमध्ये वर्णन केलेला हा मंत्र भगवान श्रीकृष्णाच्या महन्मंगल मंत्रांपैकी एक मानला जातो. या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे वासुदेवपुत्र, मी तुला नमस्कार करतो. माझ्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करण्याची मी तुला विनंती करतो. मी सर्व प्राण्यांचे रक्षण करणाऱ्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा । मंत्राचा अर्थ आणि परिणाम : विशेषतः जन्माष्टमीला या मंत्राचा जप करा आणि दररोज किमान 108 वेळा या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे भगवान कृष्ण, जे गोपींचे प्रिय गोविंद आहेत, मी तुम्हाला नमस्कार करतो. या मंत्राचा जप भगवान कृष्णाप्रती समर्पण आणि भक्ती दर्शवितो.
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे मंत्राचा अर्थ आणि परिणाम : भगवान कृष्णाचा हा मंत्र कलियुगात एक महान मंत्र मानला जातो. हा मंत्र व्यक्तीच्या सर्व पापांचा आणि दुःखांचा नाश करतो. तसेच, या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला चिंतांपासून मुक्ती मिळते.
ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं देवकीनंदनाय नम:। मंत्राचा अर्थ आणि परिणाम : भगवान कृष्णाच्या या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि धन, समृद्धी आणि संततीच्या सुखात येणारे अडथळे दूर होतील.
हेही वाचा - Vastu Tips : घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हे सोपे वास्तु उपाय करा; सुख-शांती लाभेल
(Disclaimer - येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)