सरकारने ओबीसीतून मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यान

जरांगे विधानसभेत उमेदवार उतरवणार

जालना : सरकारने ओबीसीतून मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आंतरवाली सराटी येथे गुरुवारी बैठक बोलावली आहे. २८८ विधानसभा मतदारसंघातून ८०० पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. या सर्वांशी जरांगे पाटील संवाद साधणार आहेत. रविवार, २० ऑक्टोबर रोजी पुन्हा मराठा समाजाची बैठक होणार आहे.