काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अचाट कल्पना समोर आ
'जिलबी निर्यात करायला हवी'
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अचाट कल्पना समोर आली आहे. हरियाणात काँग्रेसची प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी जिलबी निर्यात करायला हवी असे अजब वक्तव्य केले आहे.
जिलबी हा निर्यात करता येण्यासारखा पदार्थ नाही, हे राहुल गांधींना लक्षातच येत नाही. जिलबी गरमागरम खाण्याचा संकेत आहे. गरम गरम जिलबीची चव काही औरच असते. थंड जिलबी बेचव असते. ती सहसा कोणी खात नाही. जिलबी निर्यात होताना थंड पडेल आणि बेचव होईल. म्हणून जिलबी निर्यात होत नाही. राहुल गांधींना निर्यात प्रक्रिया कशी असते तेच ठाऊक नाही.