हिवाळ्यात ओठांना ठेवा गुलाबी, हा उपाय नक्की करा...
मुंबई : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळा ऋतु म्हटलं की सगळ्यांना गुलाबी थंडी आठवते. या गुलाबी थंडीत ओठांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. थंडीत ओठ सुकलेले आणि कोरडे दिसतात. यावर उपाय म्हणून सगळे बाजारात मिळणारे लिपबाम वापरून कोरडेपणा दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण बीटपासून घरच्या घरीच लिपबाम तयार करा. बीटपासून तयार केलेल्या लिपबाममुळे ओठांना छान गुलाबी रंग येतो.
बीटपासून लिपबाम कसा तयार करायचा?
बीटपासून तयार केलेले लिपबाम नैसर्गिक आहे. त्यामुळे लिपबाममुळे ओठांना काहीही त्रास नाही.
साहित्य अर्धे बीट 1 चमचा व्हॅसलिन किंवा मेण 1 चमचा खोबरेल तेल 1 चमचा गोड बदाम तेल (आवश्यक वाटल्यास टाकू शकता) 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल किंवा 1-2 थेंब व्हिटॅमिन ई तेल
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कृती सगळ्यात आधी बीटरूटची साले काढून घ्या आणि बीट किसून घ्या. यानंतर 1 ते 2 दिवस कडक उन्हात ते वाळवून घ्या. चांगले वाळल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची पावडर तयार करून घ्या. ती पावडर एका भांड्यात घ्या. पावडर जर 2 चमचे असेल तर त्यात 1 चमचे व्हिसलिन किंवा मेण टाका. त्यानंतर त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि आवश्यक वाटल्यास 1 चमचा गोड बदाम तेलही टाकू शकता. त्यानंतर त्यात 1 व्हिटॅमिन कॅप्सूल किंवा 1-2 थेंब व्हिटॅमिन तेल टाका. एका मोठ्या भांड्यात कडक पाणी करा. त्यावर एक वाटी किंवा भांड घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण घ्या. अशा प्रकारे डबल बॉईलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लिपबाम गरम करा आणि त्यातले सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. हा लिपबाम आता एखाद्या एअर टाईट डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. ८- १० दिवस चांगला राहील. हा लिपबाम नैसर्गिक असून ओठांना यापासून कुठलीही हानी होणार नाही.