महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार २

निकालाआधी महायुती आणि मविआचे नेते लागले कामाला

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होईल. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. पण निकाल लागण्याआधीच महायुती आणि मविआचे राज्यातील नेतृत्व कामाला लागले आहे. महायुती आणि मविआच्या राज्यातील नेतृत्वाने आपापल्या संभाव्य विजयी उमेदवारांना एका ठिकाणी एकत्र करण्याचा आणि सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष विमानांची आणि वाहनांची व्यवस्था करुन उमेदवारांना मुंबईत आणण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी आवश्यक ते नियोजन सुरू आहे. महायुती आणि मविआचे राज्यातील नेते  बंड केलेल्या पण जिंकून आल्यावर घरवापसी करू शकतील अशा अपक्षांच्या संपर्कात आहेत. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत राज्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी वाढली होती. या वाढलेल्या गर्दीमुळे मतदानाची टक्केवारी अंतिम टप्प्यात वाढली. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. राज्यातले वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे. 

राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात

राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात झाले. कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाले तर मुंबई शहर जिल्ह्यात 52.65 टक्के मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हा मतदानात आघाडीवर होता. पण अंतिम टप्प्यात कोल्हापूरकरांनी मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडी घेतली. गडचिरोली जिल्ह्यात 75.26 टक्के मतदान झाले.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

अहमदनगर जिल्हा - 72.47 टक्के अकोला जिल्हा - 64.76 टक्के अमरावती जिल्हा - 66.40 टक्के औरंगाबाद जिल्हा - 69.64 टक्के बीड जिल्हा - 68.88 टक्के भंडारा जिल्हा - 70.87 टक्के बुलढाणा जिल्हा - 70.60 टक्के चंद्रपूर जिल्हा - 71.33 टक्के धुळे जिल्हा - 65.47 टक्के गडचिरोली जिल्हा - 75.26 टक्के गोंदिया जिल्हा - 69.74 टक्के हिंगोली जिल्हा - 72.24 टक्के जळगाव जिल्हा - 65.80 टक्के जालना जिल्हा - 72.67 टक्के कोल्हापूर जिल्हा - 76.63 टक्के लातूर जिल्हा - 67.03 टक्के मुंबई शहर जिल्हा - 52.65 टक्के मुंबई उपनगर जिल्हा - 56.39 टक्के नागपूर जिल्हा - 61.60 टक्के नांदेड जिल्हा - 69.45 टक्के नंदुरबार जिल्हा - 71.88 टक्के नाशिक जिल्हा - 69.12 टक्के उस्मानाबाद जिल्हा - 65.62 टक्के पालघर जिल्हा - 66.63 टक्के परभणी जिल्हा - 71.45 टक्के पुणे जिल्हा - 61.62 टक्के रायगड जिल्हा - 69.15 टक्के रत्नागिरी जिल्हा - 65.23 टक्के सांगली जिल्हा - 72.12 टक्के सातारा जिल्हा - 71.95 टक्के सिंधुदुर्ग जिल्हा - 71.14 टक्के सोलापूर जिल्हा - 67.72 टक्के ठाणे जिल्हा - 56.93 टक्के वर्धा जिल्हा - 69.29 टक्के वाशिम जिल्हा - 67.09 टक्के यवतमाळ जिल्हा - 70.86 टक्के