हा मुलगा त्याच्या पालकांसह जंगल सफारीलासाठी आला हो

Leopard Attack Viral Video: जंगल सफारीदरम्यान बिबट्याचा अचानक हल्ला; मुलाच्या हातावर गंभीर ओरखडे

Leopard Attack Viral Video : हल्ली अनेकजण फिरण्यासाठी अभयारण्य, वाईल्ड पार्क अशी ठिकाणं निवडतात. बहुतेक वेळा वन्य प्राणी दिसल्यानंतर त्याला निरखून पाहण्याच्या नादात तो भयंकर हल्लाही करू शकतो, ही बाब विसरली जाते. अशाच एका धक्कादायक घटनेत, शुक्रवारी एका 13 वर्षीय मुलाच्या हाताला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या.

ही घटना बेंगळुरूमधील बन्नेरगट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये (Bannerghatta Biological Park) घडली, जिथे सफारी दरम्यान बिबट्याने एका किशोरवयीन मुलावर बिबट्याने हल्ला (Leapard Attacked Teen) केला. हा मुलगा दुपारी त्याच्या पालकांसह नॉन-एसी सफारी वाहनात खिडकीला लागून असलेल्या सीटवर बसला होता. याच खिडिकीतून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

बिबट्याने मुलाच्या हाताला लक्ष्य केले 13 वर्षीय पीडित मुलाचे नाव सुहास आहे, जो बोम्मासंद्राचा रहिवासी आहे आणि सुट्टीच्या काळात जंगल सफारीसाठी आला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बायोलॉजिकल पार्कचे कार्यकारी संचालक सूर्या सेन म्हणाले की, एका बिबट्याने अचानक गाडीचा पाठलाग केला, व्हॅनच्या खिडकीवर उडी मारली आणि मुलाच्या हाताला लक्ष्य केले. खिडकीची जाळी असल्याने तो वाचला. परंतु नखांमुळे तो जखमी झाला.

हेही वाचा - Viral Video : काय हे.. मगरीला बाईकवर बसवलं..! असं बचावकार्य कधी कुणी पाहिलं नसेल..

आता या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्या सफारी जीपचा पाठलाग करताना आणि खिडक्यांभोवती ग्रिल असूनही नखे मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या हल्ल्यात मुलाच्या हातावर गंभीर ओरखडे आले आहेत.

गाडीच्या मागे पळणारा बिबट्या

तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, की रस्त्यावर एखाद्या वाहनाच्या मागे एखादे कुत्रे पळत जावे, अगदी तशाच पद्धतीने बिबट्या या सफारी वाहनाच्या मागे पळत जातो. बिबट्या पळत असल्याचे पाहण्याचा आनंद घेण्यासाठी गाडी थोडीशी सावकाश चालवली जाते. मात्र, बिबट्या गाडीच्या जवळ येऊन पुढचे दोन पाय खिडकीवर ठेवून जणू काही आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या प्रकारात खिडकीजवळ बसलेल्या मुलाच्या हाताला इजा झाली आहे. सुदैवाने खिडकी जाळी असल्यामुळे बिबट्या आणखी काही अपाय करू शकला नाही.

व्हायरल व्हिडिओ येथे पहा -

वृत्तानुसार, हल्ल्यानंतर, सुहासला पार्क कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर, मुलाला घरी परतण्यात आले. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ते घटनेच्या परिस्थितीची चौकशी करत असल्याचे पार्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Snake VIDEO : अरे देवा! घरातून 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला; माणसासारखा उभा राहिला! बघा थरारक व्हिडिओ