महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी स्पष्ट झाला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. भाजपा 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महायुतीचे 230 उमेदवार निवडून आले. म्हणजेच काय तर महायुतीचे 230 उमेदवार आमदाराकीची शपथ घेणार आहेत.
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपाने 4 विधान परिषदेतील आमदारांनाही उमेदवारी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके या चार उमदेवारांना विधानसभेत संधी मिळाली. या चार आमदारांना विधानसभेत संधी दिल्याने विधान परिषदेतील चार आमदारांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे या जागांवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून विधानसभा निवडणूकीत काहींना डावलले गेले होते. त्यामुळे महायुतीवर काही जणांची नाराजी होती. या नाराज मंडळींची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. अनेक मंडळी नाराज आहेत. त्या नाराज मंडळींपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.