महाराष्ट्रात महायुतीची कुठेही पिछेहाट झालेली नाही
'महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झालेली नाही'
पुणे : महाराष्ट्रात महायुतीची कुठेही पिछेहाट झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत १३० विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य मिळाले. अजून थोडे प्रयत्न केले तर १६० वर पोहोचू, असे भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.
महायुतीने पश्चिम महाराष्ट्रात चार जागांवर विजय मिळवला. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही महायुतीची सरशी होईल; असा विश्वास भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.