महायुती महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करणार असे के

महायुती महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करणार

मुंबई : महायुती महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करणार असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. ते वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून दरमहा महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळत आहे. राज्यातील सुमारे अडीच कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. सध्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम दरमहा २१०० करण्यासाठी आवश्यक ते उपाय करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

पीयूष गोयल यांनी तप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दुहेरी दृष्टिकोनाचे कौतुक केले. बेटी बचाओ बेटी पढाओ या पंतप्रधान मोदींच्या उपक्रमामुळे मुलींच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणात घट झाली. संपूर्ण देशात १२ कोटी शौचालय बांधून महिलांना सन्मानाने सुरक्षित, निरोगी वातावरणात राहण्याची संधी मोदी सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. भारतात सर्वाधिक STEM ग्रॅज्युएट्स आहेत. यात ४३ टक्के महिला आहे; असेही त्यांनी सांगितले. महायुतीच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महिला वेगाने प्रगती करतील; असा विश्वास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.