माहीम विधानसभा मतदारसंघात त्रिकोणी लढत होणार आहे.

माहीम विधानसभेची लढत त्रिकोणी ?

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पक्षांकडून त्यांच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात त्रिकोणी लढत होणार आहे. माहीम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव सेनेकडून महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच सदा सरवणकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

अमित ठाकरेंपुढे उद्धव सेनेच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे. तर शिवसेनेकडून सदा सर्वणकर आणि उद्धव सेनेकडून महेश सावंत यांच्या जंगी लढत होणार आहे. एकूणच काय तर माहीम विधानसभेत त्रिकोणी लढत होणार आहे.