सरकारच्या या निर्णयामुळे काही महागड्या वस्तूंवरचा

GST Cut : या वस्तू घेणार असाल तर 5 दिवसांनंतरच खरेदी करा.. 22 सप्टेंबरला लागू होणार नवे जीएसटी दर

नवी दिल्ली : जर तुम्ही सध्या एखादी मोठी वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. कारण, फक्त पाचच दिवसांनी काही महागड्या वस्तूंच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 3 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या जीएसटीतील बदलांनुसार, आता देशात फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असतील. 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. हे नवे दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात? सरकारच्या या निर्णयामुळे काही महागड्या वस्तूंवरचा कर कमी होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या किमती थेट खाली येऊ शकतात.

कार आणि बाईक: नवीन जीएसटी दर लागू झाल्यावर कार आणि बाईकच्या किमतीत मोठा फरक पडू शकतो. ज्यांना नवीन वाहन घेण्याची घाई आहे, त्यांनी काही दिवस थांबावे, कारण यामुळे मोठी आर्थिक बचत होऊ शकते. लक्झरी वाहने: महागड्या एसयूव्ही आणि लक्झरी कार खरेदी करणाऱ्यांसाठीही ही बातमी महत्त्वाची आहे. नव्या नियमांमुळे अशा वाहनांच्या किमतींमध्येही मोठी घट अपेक्षित आहे.

हेही वाचा - Stock Market Today: फेडरल बैठकीपूर्वी भारतीय शेअर बाजारात तेजी; मोदी-ट्रम्प कॉलनंतर गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता

घरगुती इलेक्ट्रॉनिक्स: फक्त वाहनांवरच नाही, तर एसी आणि टीव्हीसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही या बदलाचा परिणाम होणार आहे. ज्यांनी ही उपकरणे खरेदी करण्याची योजना आखली आहे, त्यांनी 22 सप्टेंबरनंतर खरेदी केल्यास खर्चात थोडी-फार बचत होऊ शकते. बांधकामासाठी लागणारे काही साहित्य: या बदललेल्या जीएसटी दरांचा बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. तेव्हा हे साहित्य खरेदी करणेही साधारण आठवडाभर पुढे ढकललेले फायद्याचे ठरू शकते. सरकारने घेतलेला हा निर्णय सामान्य नागरिकांच्या हिताचा असून, जीवन आवश्यक वस्तूंवरील करही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, हे बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने, त्यापूर्वी मोठी खरेदी केल्यास ग्राहकांना नंतर पश्चात्ताप वाटू शकतो. त्यामुळे, खरेदी करताना या नव्या नियमांचा नक्की विचार करा.

हेही वाचा - UPI QR Cash Withdrawal: ATM कार्ड नसलं तरी पैसे काढा! UPI QR कोडने मिळणार रोख रक्कम सहज आणि त्वरित (Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहिती घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफा-तोट्यास जबाबदार नाही.)