कुणाचाही बाप येवू दे ते प्रकरण दबू देणार नाही, जरांगेंचा इशारा
जालना : संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चा व बीडमधील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. 28 डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या मोर्चात जनतेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी, मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. आता, ते पुन्हा मस्साजोगला जाणार असून, बीड जिल्ह्यातील 28 तारखेला होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर विरोधकांवर आणि सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. "कोणाचाही पण बाप येऊ द्या, मी प्रकरण दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही," असे म्हणत त्यांनी हत्येच्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष तपास करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचसोबत, "सरकारला मोबाईल फोन तपासायला एवढे दिवस लागतात का?" असा सवाल करून, सरकारला सडेतोड इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, "एकदा बीड जिल्ह्यातील जनतेनं तपास हातात घेतला तर सरकारला कळेल," अशा शब्दांत सरकारची निष्क्रियता लक्षात आणून दिली.
संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी योग्य पद्धतीने करणे आणि आरोपींना कठोर शिक्षाही देणे आवश्यक आहे, असा संदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 28 डिसेंबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत त्यांनी राज्यभरात एकजूट आणि संघर्षाचे संकेत दिले आहेत. यामुळे, या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे आणि बीड जिल्ह्यातील जनतेला या आंदोलकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t