एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मविआला

एमआयएमचा मविआला निर्वाणीचा इशारा

नागपूर : मविआने युतीचा प्रस्ताव दिलाय. जागावाटपाची चर्चाही झालीय. पण मविआच्या नेत्यांचा निर्णय समजलेला नाही. त्यांना निर्णय घेण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिलीय. नाहीतर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करू असा निर्वाणीचा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिलाय. नागपूरमध्ये एमआयएमच्या विदर्भ महिला कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जलील यांनी मविआला निर्वाणीचा इशारा दिला.