लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ४०० पार अशी घोषणा

'...म्हणून मोदींना संविधान बदलता आलं नाही'

जळगाव : लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ४०० पार अशी घोषणा करायला सुरुवात केली. ही घोषणा सुरू होताच विरोधकांनी भाजपा संविधान बदलणार असा प्रचार सुरू केला. या विषयावर शरद पवार सोमवारी जळगाव जिल्ह्यातील सभेत बोलले. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या होत्या. पण २०२४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान बदलता आलं नाही असे शरद पवार म्हणाले.