Weather Update : मुंबईची पावसाने दाणादाण; लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम रेल्वेची महत्वाची अपडेट जाणून घ्या
मुंबई: मुंबईसह कोकणच्या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. आजही मुंबईत रस्ते, लोकेशनच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे सामान्य जीवन अस्तव्यस्त झाले आहे. शहरातील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर लोकल ट्रेनची सेवा अडचणीत असून अनेक ठिकाणी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. चुनाभट्टी, कुर्ला, वडाळा अशा सखल भागांमध्ये पाणी साचल्याने हार्बर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी रेल्वे स्थानकावर वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रेन 25-55 मिनिटे उशिराने धावत आहेत. हेही वाचा: Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार; कोणते रस्ते बंद, कोणते सुरू आणि लोकल सेवेच वेळापत्रक जाणून घ्या
मुंबईच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. दादर, माटुंगा, लालबाग, परळ, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, ठाणे, मुलुंड, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली आणि अंधेरीमध्ये पावसामुळे हाल होऊन लोकांना वाहतूक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. हवामान खात्याने पुढील तीन तास अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले आहे. 60 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने वारे वाहतील आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.शहरातील प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे, तर शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये आज सुट्टी जाहीर केली आहे. हेही वाचा: Weather Update : पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, धरणं ओव्हरफ्लो, तर नदी पातळीत वाढ, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना अलर्ट जारी कोकणातील रत्नागिरी, रायगड, पालघर, आणि घाटमाथ्याच्या भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील प्रमुख नऊ नद्यांपैकी सहा नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. काजली नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे अंजनारी येथील प्रसिद्ध स्वयंभू दत्त मंदिरात पाणी शिरले आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
अत्यंत मुसळधार पावसामुळे लोकांना जीवितासाठी आणि सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याने सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. नागरिकांनी गरजाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये प्रवास टाळावा, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकणमध्ये पावसाचा कहर सुरू असला तरी प्रशासन आणि बचाव यंत्रणा सतत सज्ज आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगल्यास या परिस्थितीला तोंड देता येईल.