यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कत

Heavy Rain Mumbai : समुद्र खवळला ! मुंबई महानगरपालिकेने दिली भरती-ओहोटीची माहिती ; दिला सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या

high tide

राज्यभरात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. मुंबई नगर उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तसेच हवामान खात्याने वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात तसेच देशभरात काही ठिकाणी अतिवृष्टीस सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे समुद्राला उधाण आल्याने आता प्रशाससाने भरती आणि ओहोटीबद्दल माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आज सकाळी 9.16  वाजता समुद्राला 3.75  मीटरची भरती आली होती. दुपारी 3.16 वाजता 2.22  मीटरची ओहोटी येण्याचा अंदाज आहे. रात्री 8. 53 वाजता 3.14  मीटरची भरती अपेक्षित आहे, तर उद्या, 20 ऑगस्ट 2025  रोजी मध्यरात्रीनंतर 3.11  वाजता 1.05  मीटरची ओहोटी असणार आहे. 

हेही वाचा - Weather Update : मुंबईची पावसाने दाणादाण; लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम रेल्वेची महत्वाची अपडेट जाणून घ्या 

मुंबईसह उपनगरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. 24 तासांसाठी हा रेड अलर्ट असणार आहे. अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या 4 तासात 50-60 किमी प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा सुटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा - Mumbai Rain Update : संकटाचा इशारा! मुंबईकरांसाठी पुढील 4 तास महत्त्वाचे; जाणून घ्या वाऱ्याचा वेग

 शहरातील अनेक भागांमध्ये गुडघाभर, कबरेपर्यंत पाणी साचले असून काही ठिकाणी इंमारतींमध्ये आणि घरांमध्येही पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप कल्याण परिसरातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच आहात तिथेच सुरक्षित ठिकाणी थांबण्यासही सुचवले आहे. दरम्यान, पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.