कर्नाक पुलाच्या कामासाठी पालिकेला रेल्वे मेगाब्लॉक
कर्नाक पुलासाठी पालिकेला रेल्वे मेगाब्लॉकची प्रतीक्षा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मशीद बंदर स्थानकांदरम्यानच्या सुमारे १५० वर्षे जुन्या कर्नाक पुलाचे काम आधीच खूप रखडले असताना आता त्याचा गर्डर बसवण्यासाठी महापालिकेला रेल्वेकडून सहा तासांच्या मेगाब्लॉकची प्रतीक्षा आहे. मात्र मेगाब्लॉक पावसाळ्यात दिला जात नसल्याने या पुलाचे काम लांबणीवर पडणार आहे.