नवनीत राणांवर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला
नवनीत राणांवर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न
अमरावती : नवनीत राणांवर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार येथे ही घटना घडली. सभास्थळी आलेल्या मुसलमानांनी खुर्च्यांची फेकाफेक केली आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी बंदोबस्तात नवनीत राणा आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेले. सभा रद्द झाली. झालेल्या घटनेबाबत नवनीत राणांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीआधारे तसेच सभेच्या व्हिडीओंच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोषींविरोधात कायद्यानुसार कारवाई होईल, असे संकेत पोलिसांनी दिले.