राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई स
नवाब मलिकांच्या जावयाचे निधन
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. समीर खान यांच्यावर मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते.
समीर खान यांच्या वाहनाचा कुर्ला येथे अपघात झाला होता. अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले होते. नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना हा अपघात झाला होता. चालकाचा पाय अॅक्सीलेटरवर पडला आणि वाहन वेगाने समोरच्या भिंतीवर धडकले. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. समीर खान यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.