पैठणच्या जायकवाडी धरणाची पालकमंत्री अब्दुल सत्तार

जायकवाडीत 'एवढा' पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर : पैठणच्या जायकवाडी धरणाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. यानंतर परंपरेनुसार पालकमंत्र्यांनी धरणातील पाण्याची पूजा केली. 

जायकवाडीमध्ये सध्या ९० टक्के पाणीसाठा आहे. मंगळवारी पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. वर्षभर पुरावे यासाठी नाथसागराच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. 

सत्तार यांनी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डी. स्वामी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.