मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आ

आता लक्ष्य सुदर्शन घुले; बीडमध्ये सीआयडी अॅक्शन मोडवर

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. सरपंच देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी केली जात होती. मंगळवारी कराड स्वत:च पोलिसांना शरण आला होता. मंगळवारी वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर केज येथील तालुका सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात चार आरोपींना पकडण्यात आले असून तीन आरोपी फरार आहेत. त्यातील एक म्हणजे सुदर्शन घुले आहे.

हेही वाचा : सर्व दोषींना फासावर लटकवणार; फडणवीसांचा इशारा

 

 

बीडमध्ये सीआयडी अॅक्शन मोडवर

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. त्यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, आणि कृष्णा आंधळे हे आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी सीआयडीची नऊ पथके काम करत आहेत. आता सुदर्शन घुलेवर सीआयडीने फोकस केल्याचे दिसते. त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. पोलीस ठाण्यामध्ये सुदर्शन घुले यांच्या संबंधित सहा लोकांची सध्या चौकशी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

आता सुदर्शन घुले याला लक्ष्य केले जात आहे. सुदर्श घुलेला शोधण्यासाठी सीआय़डी अॅक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे. सीआयडीची नऊ पथके त्याला शोधण्यासाठी रवाना झाली आहेत.