'या' तारखांना जन्मलेले लोक अत्यंत धाडसी; कोणासमोर झुकायला आवडत नाही, पण यश-पैसा-धनसंपत्ती सर्व काही उशिराच मिळतं
Numerology : अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 1 असेल. म्हणजेच, 2 + 8 = 10, 1+0=1. अंकशास्त्रात, गणना मूळ संख्येच्या आधारे केली जाते. मूळ संख्या म्हणजे जन्मतारखेतील अंकांची बेरीज.
अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे जीवन कसे असेल याचा अंदाज बांधता येतो. अंकशास्रानुसार ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 3 असतो. या मूलांकचा स्वामी देव गुरू असतो. त्यांना अपत्य, ज्ञान, शिक्षण, आणि धार्मिक कार्यांचा कारक मानले जाते. आज आपण या लोकांचे नशीब कसे असते, याविषयी जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 3 असतो, ते लोक अत्यंत धाडसी, संघर्षमय, आणि अडचणींचा सामना करणारे असतात. त्यांना कोणापुढेही झुकायला आवडत नाही. त्यांना त्यांच्या कामात कोणी लुडबुड केलेली किंवा कोणाचाही हस्तक्षेप झालेला आवडत नाही. ते खूप स्वाभिमानी असतात. एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ते ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करतात. चिवट आणि जिद्दी असतात. या लोकांची दूरदृष्टी खूप चांगली असते. ते भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावतात.
हेही वाचा - पैसा-सुख सगळं काही मिळतं! शरीराच्या या भागांवर तीळ असणे शुभ संकेत
कार्यक्षेत्र मिळते यश मूलांक 3 असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळू शकते. ते पोलीस, प्रशासकीय अधिकारी, बँक अधिकारी किंवा धार्मिक तज्ज्ञ बनू शकतात. या मूलांकचे लोक कोणतेही काम खूप मनापासून करतात. शिक्षक, लेखक, सेल्समॅन, प्रोफेसरही बनू शकतात. मेहनतीच्या जोरावर ते आयुष्यात यशस्वी होतात.
आर्थिक परिस्थिती कशी असते? या लोकांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला खूप कठीण असू शकते. त्यांना संकटांचा सामनाही करावा लागू शकतो. जर आई-वडील किंवा पालकांची सांपत्तिक स्थिती चांगली असेल, तर फार त्रास होत नाही. पण वयानुसार त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारते. मात्र, यांना वेगवेगळ्या कारणांनी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. या लोकांकडे एकापेक्षा जास्त पैसा कमावण्याची साधने असतात. संपत्तीच्या कारणावरून जीवनात कधी ना कधी त्यांना संघर्ष करावा लागू शकतो. अडचणीच्या वेळी भावंडांची मदत मिळते या मूलांकच्या लोकांना त्यांच्या भावंडांची मदत मिळते. अडचणीच्या वेळी भाऊ-बहीण मदतीला धावतात. या लोकांना भरपूर मित्र-मैत्रीणी असतात. आई वडिलांचे त्यांच्यावर खूप प्रेम असते. हे लोक खूपच शिस्तप्रिय असतात. इतरांप्रती दयाळू आणि मनमिळाऊ असतात. कोणीतरी आपल्याला फसवेल की काय, दगा देईल काय, अशी शंका नेहमी त्यांच्या मनामध्ये असते.
कसे असते या लोकांचे वैवाहिक जीवन? मूलांक 3 असलेले लोक प्रेम संबंधात स्थिर राहत नाहीत. कारण, हे लोक कोणावर पटकन विश्वास ठेवत नाहीत. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय राहते. त्यांना धार्मिक कार्यामध्ये आवड असते. तीर्थ स्थळांना भेट देणे या लोकांना खूप आवडते. या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)