बनास सेव्ह सॉईल फार्मर प्रोड्युसर ही कंपनी ‘माती

सद्गुरू जयंतीनिमित्त शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन

मुंबई : सद्गुरूंनी सुरू केलेल्यामाती वाचवाया जागतिक मोहिमेने प्रेरित होऊन गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशातील एका ऐतिहासिक क्षणासाठी एकत्र येऊन मंगळवारी बनास सेव्ह सॉईल फार्मर प्रोड्युसर कंपनीची (BSSFPC) स्थापना केली. ‘माती वाचवामोहिमेसोबत भागीदारी असलेली भारतातील ही पहिली माती-केंद्रीत शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) असणार आहे.

गुजरात विधानसभेचे आणि बनास डेअरीचे अध्यक्ष शंकर चौधरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे तसेच थरड येथीलबनास मृदा चाचणी प्रयोगशाळा’ (BSTL), खिमान येथील बनास जैविक खत संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (BBRDL) आणि शेतकरी प्रशिक्षण हॉलचे उद्घाटन केले.                    

दोन वर्षांपूर्वी जागतिक माती वाचवा मोहीम सुरू करणारे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी एका व्हिडिओ संदेशात बनासकांठाच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करत उपक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, शेतकरी उत्पादक संघटना केवळ लोकांचे पोषण करणार नाही, तर आपल्या जीवनाचा स्रोत असलेल्या मातीचे पोषण करेल आणि तिला समृद्ध देखील करेल.

गुजरात आणि भारताच्या विकासाला महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेव्ह सॉईल बनास शेतकरी उत्पादक संघटनेच्या अग्रगण्य वाटचालीसाठी बनास डेअरीमधील प्रत्येकाचे अभिनंदन आणि आशीर्वाद. ही शेतकरी उत्पादक संघटना (FPO) केवळ लोकांचेच नाही तर आपल्या जीवनाचा स्रोत असलेल्या मातीचेही पोषण करून तिला समृद्ध करेल, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल. शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) या निश्चितपणे ग्रामीण तसेच भारताच्या कल्याणाचे भविष्य आहे, कारण त्या आपल्या ६५ टक्के लोकसंख्येसाठी आर्थिक शक्यता वाढवतील. पुन्हा एकदा शंकरभाई आणि बनास येथील सर्वांचे अभिनंदन आणि आशीर्वाद असे सद्गुरू यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. .