सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाचा जामीन
सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर दिलासा दिला. ऑक्टोबर 2021 मध्ये आयकर विभागाने छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टवरही जप्ती आणल्याचं त्यावेळी समोर आले होते. परंतु यात आता अजित पवार आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्शवभूमीवर उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. याप्रकरणी शंभुराज देसाईंकडून अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली होती . त्यात आता सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाचा जामीन देण्यात आला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आयकर खात्याने जप्त केलेली संपत्ती परत केली. अजित पवार यांनी लोकशाहीच्या बळटीकरणासाठी मोठ्या कष्टाने जो लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे. हा लोकशाहीच्या बळटीकरणाचा लढा याआधी राहुल कनाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता. सन्माननीय अजितदादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर दिलासा दिल्या नंतर सुषमा अंधारे यांनी अपमुख्यमंत्री अजित परर आणि भाजपावर हि टीका केली आहे.