पंतप्रधान मोदी रशियासाठी रवाना
नवी दिल्ली : ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना झाले आहेत. यंदा २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी रशियातील कझान येथे ब्रिक्स २०२४ ही परिषद होत आहे. रशिया या परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यंदाच्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्ष आहेत. परिषदेत ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांच्यासह एकूण २८ देशांचे नेते सहभागी होणार आहेत. यंदाच्या परिषदेत इराण, पॅलेस्टाईन आणि आर्मेनिया पण सहभागी होत आहे. ब्रिक्स शिखर परिषद २०२४ मध्ये आर्थिक सहकार्य, पर्यावरण संतुलन, संरक्षण या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होईल. सहकार्यासाठी प्रयत्न केले जातील.
भारत - चीन सामंजस्य
भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत सामंजस्य निर्माण झाले आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी रवाना होण्याआधीच परिषदेशी संबंधित दोन देशांतील तणाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे.