सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

आजारग्रस्त मुलाच्या पालकांचे सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आंदोलन

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती बैठक सुरु आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते उपस्थित आहेत. त्यात पालकांनी आपल्या मुलांना सह्याद्री अतिथीगृहाबाहेर रस्त्यावर ठेवलं, त्या मुलांना एसएसपीई (SSPE) आजार झाला आहे. हा आजार ठीक करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, सरकारने मदत करावी अशी पालकांची मागणी आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना या आजाराबाबत पत्र देखील लिहिले होते.

एसएसपीई आजार नेमका काय आहे?

  • सबॅक्युट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस म्हणजेच एसएसपीई 
  • या आजाराला 'डॉसन रोग' असेही म्हणतात 
  • गोवर विषाणूच्या सततच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे
  • मेंदूज्वरामुळे होणारा हा आजार दुर्मिळ आहे
  • लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार होता
  • कमी वयात योग्य लसीकरण न झाल्याने या आजाराची शक्यता वाढते
  • दहा हजारात दोन मुलांना या आजाराची लागण होवू शकते