ठाकरे सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठाकरे सेनेच

ठाकरे सेनेच्या वचननाम्याचं प्रकाशन

मुंबई : मुंबई : ठाकरे सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठाकरे सेनेच्या वचननाम्याचं प्रकाशन केले. काही दिवसात मविआचा जाहीरनामा येईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. हा वचननामा मांडताना काही महत्त्वाचे मु्द्दे उद्धव यांनी मांडले. कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकासाचा सरकारी जीआर रद्द करणार तसेच कोळी समाजाला मान्य होईल असा विकास करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.  

वाचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे 

कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकासाचा सरकारी जीआर रद्द करणार  कोळी समाजाला मान्य होईल असा विकास करणार  मुंबई, महाराष्ट्राच्या शहरांचं नवं गृहनिर्माण धोरण आखणार  राज्यातल्या भूमिपुत्रांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करणार  राज्यात मुलांनाही मोफत शिक्षण देणार  जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार