सावरकरांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कायद

राहुल गांधी हजर व्हा, सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३ रोजी लंडन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी, अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे प्रकरण खासदार/आमदारांच्या न्यायालयात वर्ग केले. कायद्यातील तरतुदीनुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना २ डिसेंबर  रोजी हजर व्हा आणि स्पष्टीकरण द्या अशी नोटीस बजावली आहे.