Pune Water Logging: पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
पुणे: पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये मुठा नदीपात्रातील पाणी शिरले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नदीची वाढती पाणीपातळी पाहता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली आहे. महापालिका आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून देखील लोकांची स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या एकता नगरमधील जलपूजन आणि शामसुंदर सोसायटीच्या बेसमेंटपर्यंत पाणी शिरलं आहे.
मुठा नदीपात्रातील पाणी एकता नगर सोसायटीत शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नदीचे पाणी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली जात आहे. सध्या एकता नगरमधील जलपूजन व शामसुंदर सोसायटीत बेसमेंटपर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं आहे. मंदिर पाण्याखाली गेल्याने मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. मुठा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वर मंदिरात पाणीच पाणी साचलं आहे. नदीपात्रात पाणी भरल्याने ओंकारेश्वर मंदिरात पाणी आलं आहे.