जालन्यातील मोतीराम अग्रवाल बँकेवर RBI ची कारवाई! 6 लाखांचा दंड ठोठावला
जालना: कर्ज वितरणात गंभीर अनियमितता आढळून आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स कोऑपरेटिव्ह (MAJMC) बँकेला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI च्या माहितीनुसार, बँकेने संचालकांना कर्ज देताना नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले. यामुळे बँकेच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी आणि स्पष्टीकरण मागण्यासाठी एक वैधानिक तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान बँकेचा प्रतिसाद असमाधानकारक आढळून आला. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.
हेही वाचा - Sambhajinagar Crime: प्रेमात धोका, वादातून टोकाचं पाऊल; प्रियकराने प्रेयसीला खोल घाटात ढकललं
गृहकर्ज नियमांचे उल्लंघन -
बँकेचे माजी संचालक मनोज शिनगारे यांनी 9 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी फक्त 4 कोटी रुपयांची वसुली झाली असून, उर्वरित 5 कोटी रुपये अजून थकलेले आहेत. कर्ज वाटप करताना गृहकर्ज नियमांचे उल्लंघन केल्याचे ऑडिटमध्ये समोर आले. त्यामुळे RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुन्हा उल्लंघन झाले. या प्रकरणानंतर शिनगारे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा - सांगलीत 185 बोगस पॅथॉलॉजी लॅबचा पर्दाफाश; राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला ब्रेक
मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स कोऑपरेटिव्ह ही सहकारी बँक 5 एप्रिल 1998 रोजी स्थापना करण्यात आली. संस्थापक मोतीराम अग्रवाल आणि रमेशभाई ओझा यांनी ग्रामीण आणि नागरी समुदायासाठी ही बँक सुरू केली. MAJMC बँकेचे अधिकृत मोबाईल अॅप उपलब्ध असून ती ग्राहकांना सुरक्षित व्यवहार, बँकिंग सुविधा, आणि SMS/मिस्ड कॉल अलर्ट सेवा पुरवते.