भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची

रोहित शर्माला दोन विक्रम करण्याची संधी

चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवार १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत दोन विक्रम करण्याची संधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे आहे.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये विरेंद्र सेहवाग आघाडीवर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९१ षटकार मारले आहेत. तर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ८४ षटकार मारले आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये अकराव्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत किमान आठ षटकार मारले तर रोहित कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय क्रिकेटपटू होणार आहे. 

रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये ४८ शतके केली आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत आणखी दोन शतके केल्यास रोहित कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक साजरे करेल.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिका

  1. पहिली कसोटी - चिदंबरम स्टेडियम, चेन्नई - गुरुवार १९ सप्टेंबर २०२४ ते सोमवार २३ सप्टेंबर २०२४ - थेट प्रक्षेपण सकाळी ९.३० पासून
  2. दुसरी कसोटी - ग्रीन पार्क, कानपूर - शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४ ते मंगळवार १ ऑक्टोबर २०२४ - थेट प्रक्षेपण सकाळी ९.३० पासून