रोशनी नाडर या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात

रोशनी नाडर ठरल्या जगातील 5 व्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला; जगातील इतर 4 श्रीमंत महिला कोण आहेत? जाणून घ्या

Top Richest Women in the World

Top Richest Women in the World: सध्या रोशनी नाडर यांचे नाव सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारण रोशनी नादरची एकूण संपत्ती आहे. वास्तविक, हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 च्या प्रसिद्धीनंतर, रोशनी नादरचे नाव जगातील 5 सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. एचसीएल टेकच्या रोशनी नादर आता 41 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिल्या बनल्या आहे. रोशनी नाडर या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. आज या लेखातून जगातील 4 सर्वात श्रीमंत महिलांबद्दल जाणून घेऊयात. 

अ‍ॅलिस वॉल्टन - 

एलिस वॉल्टन ही जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे. त्यांची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलर्स आहे. एलिस वॉल्टन या जगातील 13 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी वॉलमार्टमध्ये एलिस वॉल्टनची 47% हिस्सेदारी आहे.

हेही वाचा- बँकिंग उद्योगाला करावा लागू शकतो मोठ्या समस्येचा सामना; आशियातील सर्वात श्रीमंत बँकरचा इशारा

फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स 

फ्रँकोइस बेटेनकोर्ट माईझ या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 78.4 अब्ज डॉलर  आहे. ती जगातील सर्वात मोठी सौंदर्यप्रसाधने कंपनी लॉरियलची होल्डिंग कंपनी टेथिसची अध्यक्षा असून लॉरियल ग्रुपच्या संचालक मंडळाची उपाध्यक्षा आहे.

ज्युलिया फ्लेशर कोच 

ज्युलिया फ्लेशर कोच या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 75.4 अब्ज डॉलर्स आहे. 

हेही वाचा- Hurun Global Rich List: मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर! एकूण संपत्तीत झाली 'इतकी' घट

जॅकलिन मार्स

जॅकलिन मार्स या जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला असून त्यांची एकूण संपत्ती 45.4 अब्ज डॉलर आहे. जॅकलिन मार्स या जगातील सर्वात मोठी Mars Inc. कंपनीची मालकीण आहे.