सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी विरार-चर्चगेट-विरा

'विरार-चर्चगेट-विरार' लेडीज स्पेशलच्या फेऱ्या वाढवा

मुंबई : सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी विरार-चर्चगेट-विरार या लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच सायंकाळी ६ नंतर प्रत्येक अर्ध्या तासाने दादर ते विरार लोकल चालवाव्यात. सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते १० दरम्यान विरार-चर्चगेट-विरार काही लोकल डबल फास्ट कराव्यात तर काहींना अलटून पालटून थांबे द्यावेत. डहाणू-दिवा ते पनवेल मेमू प्रत्येक तासाला सोडावी किंवा त्या मार्गावर लोकल सुरू कराव्यात, अशा मागण्या 'आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी' संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडे केल्या आहेत.