जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे चांदोली धरण 90.02 टक्के भरलं! एकाच दिवसात पाणीसाठ्यात पाऊण टीएमसीने वाढ
सांगली : राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट (Chandoli Rain) क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे धरण 90.02 टक्के भरले आहे. धरणात सध्या 30.96 टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक 6968 क्युसेकने सुरू आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 90.02 टक्के भरले आहे. धरणात सध्या 30.96 टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक 6968 क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे धरणात अजूनही पाणी वाढत आहे. पाणलोट क्षेत्रासह सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
हेही वाचा - Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे पूर्ण भरली; 19 ऑगस्टपर्यंत कुठल्या धरणात पाणी किती?
चांदोली धरण शिराळा तालुक्यात आहे. पावसामुळे येथील वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रूक तलाव, रेठरे धरण, मोर्णा धरण, टाकवे आणि शिवणी तलावांसह सर्व 49 पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा आणि चांदोली परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. निवळे येथे 24 तासांत 84 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, केवळ एका दिवसात पाऊण टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.
पाणलोट क्षेत्रातील 24 तासांतील पाऊस (मिमीमध्ये) पाथरपुंज - नोंद नाही निवळे - 84 (एकूण - 3987) धनगरवाडा - 42 (एकूण - 2495) चांदोली - 33 (एकूण - 2247) वारणावती - 40 (एकूण - 2179)
हेही वाचा - Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत 'कोसळधार'; तज्ञांनी सांगितलं ढगफुटीसदृश्य पावसाचं नेमकं कारण