कल्याण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
कल्याण : कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळीने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केले आणि तिची हत्या केली. अल्पवयीन मुलीच्या हत्येमध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग असल्याची माहिती आहे. आरोपी गवळीची पत्नी साक्षीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी विशाल गवळीला अटक केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कल्याणच्या कोळसेवाडीतील ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचे कल्याणमध्ये संतप्त पडसाद उमटत आहेत. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या
विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात केली. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिला. अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी फरार होता. पण आता विशाल गवळीला अटक झाली आहे. मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. विशाल गवळी अत्यंत खतरनाक गुंड आहे. त्याच्यावर कल्याण पूर्वेत विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय बलात्कार, पॉक्सो सारख्या गुन्हयांमधील हा आरोपी तडीपार होता.
कल्याणच्या कोळसेवाडीतील रहिवाशांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली गेली आहे.