उत्तराखंडचे तलाव शहर म्हणजेच नैनिताल हे नवीन वर्ष

'या' शहरात 31 डिसेंबरला करण्यात येणार खास व्यवस्था

उत्तराखंडउत्तराखंडचे तलाव शहर म्हणजेच नैनिताल हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. नैनिताल हॉटेल असोसिएशननेही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी पूर्ण केली आहे. नैनितालमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. रात्रीचे तापमान उणे १ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. अशा परिस्थितीत नैनितालला येणाऱ्या पर्यटकांना थंडीपासून वाचवण्यासाठी हॉटेल असोसिएशनतर्फे शहरातील मॉल रोडवर ३१ डिसेंबर रोजी हिटर बसवण्यात येणार आहेत. नैनितालमध्ये पहिल्यांदाच मॉल रोडवर अशाप्रकारे हिटर बसवण्याची योजना आहे. यासोबतच संपूर्ण मॉल रोड विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे. मॉल रोडवरही संगीताची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पनवेलमध्ये रिसॉर्ट, फार्म हाऊस पर्यटकांनी फुल्ल

नैनिताल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय सिंह बिश्त यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने नैनितालमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. अशा स्थितीत नैनिताल हॉटेल असोसिएशननेही तयारी पूर्ण केली आहे. याआधी सारखेच या वेळीही हॉटेल असोसिएशनतर्फे मॉल रोडसह अन्य ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पर्यटकांना थंडीपासून वाचता यावे यासाठी मॉल रोडवरही हिटर बसविण्यात येणार आहेत. नाताळ आणि नवीन वर्षासाठी हॉटेल्समध्ये बुकिंग येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चांगला व्यवसाय अपेक्षित आहे. पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक टाळता यावी यासाठी हॉटेल असोसिएशनने हॉटेलच्या नावांची आणि त्यांच्या फोन नंबरची यादी शहरातील एंट्री पॉईंटवर लावली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.