मध्य रेल्वे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विशेष उ

मध्य रेल्वेच्या विशेष उपनगरी गाड्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामामुळे अनेकांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विशेष उपनगरी गाड्या सोडणार आहे. विशेष गाड्या त्यांच्या मार्गातील सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या आहेत. 

विशेष उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक :

मंगळवार १९ आणि बुधवार २० नोव्हेंबर २०२४ : 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३ वाजता सुटणार आणि कल्याण येथे पहाटे ४.३० वाजता पोहोचणार कल्याण येथून पहाटे ३ वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ४.३० वाजता पोहोचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ३ वाजता सुटणार आणि पनवेल येथे पहाटे ४.२० वाजता पोहोचणार पनवेल येथून पहाटे ३ वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ४.२० वाजता पोहोचणार

बुधवार २० आणि गुरुवार २१ नोव्हेंबर २०२४ : 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे १.१० वाजता सुटणार आणि कल्याण येथे पहाटे २.४० वाजता पोहोचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे २.३० वाजता सुटणार आणि कल्याण येथे पहाटे ४ वाजता पोहोचणार कल्याण येथून पहाटे १ वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे २.३० वाजता पोहोचणार कल्याण येथून पहाटे २ वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ३.३० वाजता पोहोचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे १.४० वाजता सुटणार आणि पनवेल येथे पहाटे ३ वाजता पोहोचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे २.३० वाजता सुटणार आणि पनवेल येथे पहाटे ४.१० वाजता पोहोचणार पनवेल येथून पहाटे १ वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे २.२० वाजता पोहोचणार पनवेल येथून पहाटे २.३० वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ३.५० वाजता पोहोचणार