राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्र

एसटीला मिळणार ३०० कोटी रुपये

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या सुमारे १५०० हेक्टर लँड बँकचा विकास करून त्या माध्यमातून महसूल मिळविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एसटीच्या ३८ जागांचा विकास केला जाणार असून त्यातून सुमारे ३०० कोटी रुपयांचा महसूल महामंडळाला मिळणार आहे. या महासुलाचा वापर एसटीची बिकट अवस्था सुधारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.