ताज्या बातम्या
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज देता येणार आहे.
३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला आहे, त्यानंतर राज्यातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत असली तरी शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी अर्ज दाखल करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत.