नागपूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कु

Stray Dogs Attack Girl: नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षांच्या मुलीवर हल्ला; घटनेत निष्पाप चिमुरडीचा मृत्यू

Stray Dogs Attack Girl

Stray Dogs Attack On Girl at Nagpur: देशातील अनेक राज्यात भटक्या कुत्र्यांचे मानवावरील हल्ले वाढले आहेत. तुम्ही सोशल मीडियावर पाहिले तर तुम्हाला असे काही व्हिडिओ आढळतील ज्यात अनेक भटके कुत्र्ये एकत्र मानवावर हल्ला करताना दिसत आहेच. अलिकडेच नागपूरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. नागपूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू - 

ही घटना नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील आहे. रामसिंग आणि लक्ष्मी यांनी तीन मुली आणि दोन मुले आहेत. हे सर्वजण गेल्या काही वर्षांपासून लक्ष्मीची आई रेखा रामटेके यांच्यासोबत गुमगाव येथे राहत होते. लक्ष्मी आणि रेखा दररोज जवळच्या नदीवर कुटुंबातील सदस्यांचे कपडे धुण्यासाठी जात असतं. यावेळी लक्ष्मीची 4 वर्षांची मुलगी हर्षिता देखील त्यांच्याबरोबर जात असे. 

हेही वाचा - बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज; वाईल्ड ॲनिमल काऊंटिंगसाठी तयारी पूर्ण

दरम्यान, गुरुवारी, हर्षिताची आजी आणि आई नदीवर गेल्या होत्या. त्यानंतर हर्षिताही त्यांच्या मागे गेली. त्यादरम्यान, ती पुलाखाली खेळत होती आणि अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने मुलीवर हल्ला केला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. जेव्हा काही लोक नदीकडे धावले तेव्हा त्यांना हर्षिता रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली.

हेही वाचा - मुंबई-नागपूर प्रवास महागला, 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर टोल 19% वाढणार 

मीरा रोड येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी - 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथे घराबाहेर फुटबॉल खेळत असताना एका आठ वर्षांच्या मुलावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. दक्ष रावत नावाच्या या मुलाच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. मुलाने कुत्र्याचा करण्यापूर्वीच कुत्र्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चावा घेतला.