Swadeshi Vs USA : Trump Tariff मुळे देशात सोशल मीडिया अन् जाहिरातीत 'अमेरिका विरुद्ध स्वदेशी' प्रचार; वातावरण तापले
नवी दिल्ली : ट्रम्प टॅरिफनंतर स्वदेशी विरुद्ध अमेरिका (Swadeshi Vs USA) हा शब्द ट्रेंड होत आहे, अमेरिकन कंपन्यांबद्दल अनेक दावे केले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ (Trump Tariff) लादून भारतातील लोकांना नाराज केले आहे. यामुळेच लोक आता स्वदेशीवर भर देत आहेत. स्वदेशी (Swadeshi) एक्स वर ट्रेंड होत आहे.
बिल क्लिंटन यांच्या राजवटीच्या शेवटच्या काळात सुरू झालेल्या प्रयत्नांनंतर आणि बुशपासून ओबामा आणि बायडेनपर्यंतच्या सर्व प्रयत्नांनंतर, भारत-अमेरिका संबंध वाढू लागले. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी मित्र म्हटल्यानंतरही भारताला धक्का दिला. अमेरिकेच्या या सर्व राष्ट्राध्यक्षांना भविष्यात त्यांच्या देशाला भारताची किती गरज असेल याची कल्पना होती. परंतु ट्रम्प यांनी मित्र देश भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला. भारताने यावर संयमी भूमिका स्वीकारली आहे. तथापि, भारतीय आणि अमेरिकन जनतेला हे आवडलेले नाही. अमेरिकेत नेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वच जण ट्रम्प यांच्या भूमिकेशी असहमत असताना, भारतातही अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे ही मागणी अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर होत आहे. Swadeshi Vs USA हा हॅशटॅग एक्स वर ट्रेंड होत आहे.
US Tariffs advertisement war begins : कोकाकोला विरुद्ध पेप्सी, मॅक्डॉनल्ड्स विरुद्ध बर्गर किंग, अॅपलविरुद्ध मायक्रोसॉफ्ट, ऑडी विरुद्ध बीएमडब्ल्यू या कंपन्यांमधील जाहिरातयुद्ध लोकप्रिय आहे. आता भारतात दोन टूथपेस्ट कंपन्यांमध्ये जाहिरात युद्ध सुरू झालं आहे. यातील एक कंपनी भारतीय आहे तर एक अमेरिकन. आयात शुल्कावरून भारत व अमेरिकेत तणाव निर्माण झालेला असताना एका टूथपेस्ट कंपनीने राष्ट्रीयत्वाचा वापर जाहिरातीसाठी केला आहे.
कोलगेट या अमेरिकन टूथपेस्ट कंपनीची भारतातील प्रतिस्पर्धी डाबरने राष्ट्राभिमानाचा मुद्दा घेत कोलगेटवर जाहिरातीच्या माध्यमातून डावपेच खेळला आहे. तसेच डाबरने भारतीय ग्राहकांना अमेरिकन कंपन्यांपासून दूर राहण्याचं व स्वदेशीचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं आहे. डाबरने आपल्या जाहिरातीत कोलगेटचा थेट उल्लेख केलेला नसला तरी जो प्रातिनिधिक फोटो त्यांनी वापरला आहे तो कोलगेटच्या टूथपेस्ट बॉक्ससारखाच आहे. तसेच अमेरिकन झेंड्याच्या रंगात Born there, not here असं देखील जाहिरातीत म्हटलं आहे.
भारत व अमेरिकेतील व्यापार संघर्षात भारतीय कंपन्या ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (5 सप्टेंबर) पुन्हा एकदा नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले मुलांनी परदेशी ब्रँड्सची यादी तयार करावी आणि शिक्षकांनी त्यांना हे ब्रँड्स वापरण्यापासून परावृत्त करावं.
अमेरिका आणि भारत संबंध सुधारण्याची कितपत आशा आहे? लोकशाहीमुळे अमेरिका आणि भारत एकमेकांच्या जवळ आले. शिवाय, या दोन्ही देशांचे हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत. अमेरिकेला आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी भारताच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे, तर भारताला आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची आवश्यकता आहे. भारताच्या लोकसंख्येचा फायदा अमेरिकेला होऊ शकतो. तर, भारत अमेरिकन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक मजबूत होऊ शकतो. या विचारसरणीमुळे दोन्ही देशांचे नेतृत्व एकमेकांच्या जवळ आले. पण, आता सर्व काही एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे आणि लवकरच दोन्ही देशांमधील ही कोंडी संपेल अशी आशा आहे. पण, नुकसान झाले आहे. विश्वास गमावला. जनतेशी संपर्क तुटला.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि कमला यांच्यातील चढाओढीत सोशल मीडियावर भारतातील लोक आपापसात विभागले गेले होते. काही जण ट्रम्प यांना पसंती देत होते, तर काही जण कमला हॅरिस यांच्या बाजूने होते. असे वाटत होते की, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतातील लोकांचाही सहभाग होता, पण आता भारतात अमेरिकाविरोधी वातावरण तयार झाले आहे आणि ते सोशल मीडियावर युजर्सच्या माध्यमातून पसरले आहे.
एक्सवर भारत-अमेरिका व्यापारस्थितीविषयी काय सुरू आहे?
दरम्यान, सोशल मीडियावर लोक वेगवेगळे हॅशटॅग्ज आणत आहेत. कॅन्डल क्वीन नावाच्या एक्स वापरकर्त्याने वेगवेगळ्या पोस्टद्वारे बहिष्काराबद्दल पोस्ट केली आहे. चंद्र प्रकाश मिश्रा यांनी लिहिले आहे की, "स्वदेशी चळवळ पुन्हा एकदा! ज्याप्रमाणे भारताने एकेकाळी इंग्रजी वस्तूंविरुद्ध लढा दिला होता, त्याचप्रमाणे आता अमेरिकन कंपन्यांच्या आर्थिक नियंत्रणातून मुक्तता मिळवण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या लोकांना पाठिंबा द्या, स्वदेशी स्वीकारा. देशाला आवाहन - अमेरिकन कॉर्पोरेशन्सवर बहिष्कार घाला!"
भारत आणि अमेरिकेतील संबंध इतके खोलवर गेले होते की अमेरिकन कंपन्यांची पोहोच प्रत्येक घर आणि गावापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक भारतीय निश्चितच कोणत्या ना कोणत्या अमेरिकन कंपनीचा ग्राहक आहे. अशा परिस्थितीत, ट्रम्पच्या निर्णयांमुळे सामान्य जनतेमध्ये संताप दिसून येत आहे हे स्पष्ट आहे. भारतात मजबूत पकड असलेल्या टॉप अमेरिकन कंपन्या येथे आहेत...
तंत्रज्ञान आणि डिजिटल अमेझॉन, गुगल, फेसबुक, मेटा, अॅडोब, मायक्रोसॉफ्ट, एक्स, अॅपल फॅशन आणि जीवनशैली नाइके, Levi's, Tommy Hilfiger, Ralph Lauren, Calvin Klein आरोग्य आणि फार्मा जॉन्सन अँड जॉन्सन, Pfizer, Abbott, Procter & Gamble वित्त आणि सल्लागार सेवा Goldman Sachs, JP Morgan Chase, Morgan Stanley, Master Card Visa Payments