चिकनच्या पार्सरमध्ये डुक्कराचे मांस आढळल्याचा प्रक

Blinkit Online Order : मागवलं चिकन आलं डुकराचं मटण...मुंब्रा येथील धक्कादायक घटना, संतप्त जमावाचा हल्ला

ऑनलाइन पदार्थ मागवल्यानंतर त्यामध्ये काही ना काही विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. अशातच आता ठाण्यातील मुंब्रा येथून एक घटना समोर आली आहे. blinkit या ऑनलाईन स्टोअरवरून चिकनची ऑर्डर केली होती. पण चिकनच्या पार्सरमध्ये डुक्कराचे मांस आढळल्याचा प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे संतप्त जमावाने blinkit गोडावूनची तोडफोड केली आहे. 

 समोर आलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने blinkit वरून चिकन ऑर्डर केले. मात्र या ग्राहकाला चिकनच्या ऐवजी डुक्कराचे मांस असल्याचा संशय त्याला आला. त्यानंतर त्याने संबंधित blinkit  च्या गोडाऊनमध्ये जाऊन या सदर प्रॉडक्ट विषयी जाब विचारणा केली. 

हेही वाचा - 'स्वतःसाठी कोणताही आर्थिक लाभ...', करिश्मा कपूरच्या वकिलाचा न्यायालयात खुलासा, खटला करण्याचं सांगितलं कारण 

दरम्याने त्यावेळी सदर कर्मचाऱ्याला देखील आपण कोणतं प्रॉडक्ट सेल करतो, याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे जमलेल्या जमावाकडून गोडाऊनची तोडफोड करण्यात आली. गोडाऊनवर मोठ्या संख्येनं जमाव जमला होता, पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.