IND-W vs AUS-W Live Streaming: आज रंगणार भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाचा निर्णायक सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहायचे?
IND-W vs AUS-W Live Streaming: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शनिवार, 20 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी झाली असून हा तिसरा सामना मालिकेचा विजेता ठरवेल.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने अप्रतिम पुनरागमन करत 102 धावांनी मोठा विजय मिळवला. मुल्लानपूर (मोहाली) येथील महाराजा यादवींद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा धडाका थोपवला होता. त्यामुळे मालिकेत आता दोन्ही संघ विजयाच्या निर्धाराने उतरणार आहेत. हा सामना 2025 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सरावही ठरेल.
हेही वाचा - Asia Cup 2025 : भारत-ओमान सामना आज, जाणून घ्या थेट प्रक्षेपणाची माहिती
सामना कधी आणि कुठे?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला तिसरा एकदिवसीय सामना शनिवार, 20 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल, तर टॉस दुपारी 1:00 वाजता होणार आहे.
थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
टीव्हीवर: भारतीय प्रेक्षकांसाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हा अधिकृत प्रसारण भागीदार आहे. सामना स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स 2 चॅनेलवर थेट पाहता येईल.
ऑनलाइन: सामना Disney+ Hotstar (JioHotstar) अॅप आणि वेबसाइटवर थेट पाहता येईल. प्रेक्षकांना त्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक असेल. हा सामना जिंकणारा संघ मालिकेचा विजेता ठरणार असल्याने प्रेक्षकांसाठी आजची संध्याकाळ रोमांचक ठरणार आहे.