'हळदीच्या उत्पादनात नव्या संधी निर्माण होतील'
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेचे कौतुक करताना सांगितले की, या मंडळामुळे हळद उत्पादनात नवोन्मेष, जागतिक स्तरावर प्रचार आणि मूल्यवर्धनासाठी नवी दालने उघडली जातील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले की राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना ही देशभरातील कष्टकरी हळद शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. या मंडळामुळे हळदीच्या उत्पादनात नव्या संधी निर्माण होतील, जागतिक स्तरावर तिचा प्रचार आणि प्रसिद्धी होईल तसेच त्याच्या मूल्यवर्धनाला चालना मिळेल.याशिवाय, पुरवठा साखळ्या अधिक सक्षम होतील, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांनाही होईल.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेली पोस्ट
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. स्वयंपाकघरातील अत्यावश्यक आणि निरोगी उत्पादन म्हणून जागतिक स्तरावर हळदीच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी आम्ही उत्पादनाला चालना देण्याचा विचार करत आहोत.
हेही वाचा : सुरेश धस राजीनामा देणार. पण...
हळद मूल्य साखळीतील पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि कौशल्ये बळकट करणे आणि आमचे शेतकरी, निर्यातदार आणि अर्थव्यवस्थेला अधिक फायदा होण्यासाठी या सोनेरी मसाल्याच्या आमच्या जुन्या ज्ञानाचे जतन आणि प्रचार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.