Today's Horoscope 2025 : मालमत्तेत केलेली गुंतवणूक 'या' राशीच्या लोकांसाठी ठरेल फायदेशीर; जाणून घ्या
मेष: आज तुम्ही थोडे भावूक व्हाल, पण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. जीवनसाथीसोबत पैशांच्या गोष्टींवर वाद होऊ शकतो. तुमच्या खेळकर स्वभावामुळे घरात आनंदमय वातावरण राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही लवकर ऑफिसमधून निघण्याचा विचार कराल, पण रस्त्यात ट्रॅफिकमुळे ते जमणार नाही.
वृषभ: थोडा आराम करा. घरजमिनी किंवा मालमत्तेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रमसंबंधात जवळीक आणि आपुलकी वाढेल. तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी खास करेल.
मिथुन: दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत केली तर तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल. विचारपूर्वक पैसे खर्च करा आणि उधळपट्टी करणे टाळा. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि यशही मिळेल. तुमच्या जोडीदारावर असलेलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करा.
कर्क: अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित जिमला जा. उरलेला पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवा, भविष्यात त्याचा उपयोग होईल. कामाच्या ठिकाणी अतिस्पष्ट बोलणे आणि भावना दाखवणे टाळा, नाहीतर तुमच्या पदावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पुरेसा आराम न मिळाल्यास वैवाहिक आयुष्यात तणाव जाणवेल.
सिंह: आज तुम्ही उत्साही राहाल आणि तुमचे आरेग्य चांगले राहील. तुमच्या आईच्या नातेवाईकांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असेल आणि तुम्ही नवीन मित्र बनवाल. आज तुम्ही जवळच्या व्यक्तींसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणाचा आनंद घ्याल. नवीन संकल्पना लाभदायी ठरतील. खरेदी करताना पैशींची उधलपट्टी करणे टाळा.
तूळ: तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज तुम्हाला आनंदाचे अनेक क्षण अनुभवायला मिळतील. विवाहित जोडप्यांना आज त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर चांगला पैसा खर्च करावा लागू शकतो. जर तुम्हाला घरात काही बदल करायचे असतील तर कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
वृश्चिक: तुमच्या अडचणींवर हसत हसत मात करणे हा उत्तम मार्ग आहे. मोकळ्या वेळा घर सजवण्यासाठी वापरा. तसेच, कुटुंबीयांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस यशाचा आहे, त्यांना अपेक्षित मान-सन्मान मिळेल. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल.
धनु: वरिष्ठांकडून मिळणाऱ्या दैवी ज्ञानमुळे तुम्हाला शांतता आणि समाधान मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत नसाल, परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. भूतकाळात केलेल्या गुंतवणूकीमुळे आज तुम्हाला फायदा होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. भागीदारी व्यवसाय चांगला वाटेल, पण सर्वकाही स्पष्ट करा.
मकर: तुमचं आरोग्य उत्तम राहील. अचानक पैसे मिळाल्याने थकलेली बिले आणि तातडीचे खर्च भागतील. काहीजण दागिने किंवा घरासाठी वस्तू खरेदी करू शकतात. आज मैत्रीत दुरावा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धी आणि समज वापरावी लागेल. नेहमीच मनासारखं होत नाही, आजचा दिवस तसाच असेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.
कुंभ: प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला तयार करा. घरात एखादा कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल.
मीन: तुमच्या मुलांच्या कामाने तुम्हाला खूप आनंद होईल. घरातील कामं पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला हातभार लावतील. आज तुम्ही प्रेमळ मूडमध्ये असाल आणि तुमच्या जोडीदारासाठी काही खास योजना कराल. ऑफिसमधील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)