अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे सतर्कतेमुळे रेल्व

अमरावतीत सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला. धामणगाव येथे रेल्वे रुळ तुटला होता.  पण आयत्यावेळी पुरी - अहमदाबाद सुपर एक्सप्रेस वीस मिनिटे उशिराने धावत असल्याचे जाहीर झाले. गाडी येण्याआधी ट्रॅकमनने एकदा रेल्वे मार्गाची तपासणी केली. या तपासणीवेळी रुळ तुटल्याचे लक्षात आले. रुळ जोडणारे वेल्डिंग उखडल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. रुळ तुटल्याचे लक्षात येताच ट्रॅकमनने लगेच रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने रेल्वे प्रशासन कामाला लागले. रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे अपघात टळला. ट्रॅकमनने तपासणी करण्याआधी गाडी आली असती तर अपघात होण्याचा धोका होता. हा धोका टळला. रेल्वे प्रशासनाने रुळ तुटण्याचे नेमके कारण काय आणि यासाठी जबाबदार कोण ? हे शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.