वाढत्या यूपीआय पेमेंटमुळे एटीएमची गरज कमी होत चालल

यूपीआयमुळे एटीएम गरज संपली ?

नवी दिल्ली : भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने आकार घेत आहे. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे मजबूत जाळे देशात उभे राहिले आहे. यामुळे देशात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने करणे शक्य झाल्याने लोकांनी कॅश बाळगणे कमी केले आहे. परिणामी एटीएमची संख्या घटल्याचे दिसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएमच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती. वर्षभरात सप्टेंबर २०२४ ही संख्या घटून २,१५,००० वर आली आहे.